Under its education program, JBGVS recently completed the construction of the new upper primary Jilha Parishad School in Takli (Chana) village in Wardha district of Maharashtra, in association with the local school management committee. The well-equipped building was inaugurated at the hands of Ms Naina Gunde, Chief Implementation Officer, Jilha Parishad and Mr Bharat Mahoday, Advisor to JBGVS (Wardha). The inauguration was done on the death anniversary of Sant Gadge Baba in remembrance of the great clean-up work undertaken by him. The event was covered in the Wardha edition of the newspaper Sakaal.
शिक्षण हा जेबीजीव्हीएसच्या पाच प्रमुख कार्यक्षेत्रांपैकी एक असून अलीकडेच संस्थे तर्फे वर्धा जिल्ह्याच्या टाकळी (चना) गावातील उच्च प्रार्थमिक जिल्हा परिषद शाळेच्या नव्या इमारतीचे बांधकाम पूर्ण करण्यात आले. स्थानिक शाळा व्यवस्थापन समितीच्या सहकार्याने हे काम पूर्णत्वास गेले. सुसज्ज अशा या शाळेचे उद्घाटन श्रीमती नैना गुंडे, मुख्य कार्यपालन अधिकारी, जिल्हा परिषद व श्री भरत महोदय, सल्लागार, जेबीजीव्हीएस (वर्धा) यांच्या हस्ते करण्यात आले. संत गाडगे बाबांच्या पुण्यतिथीला उद्घाटन करून त्यांच्या स्वच्छतेच्या महान कार्याला एक प्रकारे मानवंदना दिली गेली. या समारंभाची बातमी सकाळ (वर्धा आवृत्ती) मध्ये प्रकाशित झाली.
No comments:
Post a Comment