The various activities that are regularly organized by JBGVS under its Adolescent Girls Development Program contribute to the Government of India’s Beti Bachao-Beti Padhao campaign. A training program was recently conducted in the villages of Taje and Pimploli in Nane Maval area of Maval taluka, Pune district, for adolescent girls in the age group of 14 to 18 years. The objective of the training was to focus on the physical and mental transition that takes place in adolescent girls.
The training was conducted through interesting interactive mediums like games, stories, quizzes and plays, in which 45 girls participated. The organizers observed that although guidance is provided in schools, many girls who have questions in their mind are very hesitant to ask. It was also observed that the above mentioned interactive mediums are very effective in driving home the point.
जेबीजीव्हीएसच्या किशोरी विकास उपक्रमांतर्गत वेळोवेळी जे कार्यक्रम आयोजित केले जातात त्यातून भारत सरकारच्या बेटी बचाव-बेटी पढाव मोहिमेला निश्चित हातभार लागत असतो. अलीकडेच पुणे जिल्ह्यातील मावळ तालुक्यात नाणे मावळ भागात ताजे व पिंपळोली गावांत १४ ते १८ वयोगटातील किशोरींसाठी प्रशिक्षण आयोजित करण्यात आले होते. किशोरवयीन मुलींमध्ये होणारे शारीरिक व मानसिक बदल यांबद्दल माहिती देणे हा मुख्य हेतू होता.
या प्रशिक्षणात खेळ, गोष्टी, प्रश्नमंजुषा व नाट्य यांसारख्या आकर्षक माध्यमांचा उपयोग करण्यात आला ज्यामध्ये ४५ किशोरी सहभागी झाल्या होत्या. आयोजकांचे असे निरीक्षण आहे की अनेक शाळांतून मार्गदर्शन केले जाते पण किशोरी मनात असलेले प्रश्न विचारायला संकोच करतात, तसेच वरील नाविन्यपूर्ण पद्धतीने विषय समजावून सांगायला सोपे जाते.
No comments:
Post a Comment