Monday, December 12, 2016

Exhibition of students' school projects - शालेय विद्यार्थ्यांच्या प्रकल्पांचे प्रदर्शन

Under the Bajaj Education Initiative, which is implemented by JBGVS, an exhibition of innovative students' projects from municipal and underprivileged schools of Pimpri-Chinchwad municipal area was organized at Bajaj Cultural Centre on 10th December. The students, who were from Marathi, English and Urdu mediums, were given complete freedom to choose the topic of their projects and their mode of presentation. The results were creative and outstanding, as can be seen in the pictures below! The youngsters skillfully made and presented projects on topics ranging like rainwater harvesting, use of solar and wind power, water efficient farming practices, traffic management, environment conservation and energy efficient technology.
जेबीजीव्हीएस कडून राबवण्यात येणाऱ्या बजाज शिक्षण उपक्रमांतर्गत पिंपरी-चिंचवड महापालिका परिसरातील सरकारी व निम्न आर्थिक स्थरातील खाजगी शाळांतील मुलांनी सादर केलेल्या प्रकल्पांचे प्रदर्शन १० डिसेंबर रोजी बजाज कल्चरल सेंटर मध्ये आयोजित केले होते. विषय निवडीचे व सादरीकरणाचे पूर्ण स्वातंत्र्य मुलांना दिले होते, जी मराठी, इंग्रजी व उर्दू अशा तीन माध्यमांत शिकतात. खालील छायाचित्रांमध्ये हे लक्षात येईलच की मुलांचे प्रकल्प उत्तम झाले होते. मुलांनी पर्जन्यजल व्यवस्थापन, सौर व पवन उर्जेचा वापर, जल संवर्धन करणाऱ्या शेती पद्धती, वाहतूक व्यवस्थापन, पर्यावरण रक्षण व उर्जा कार्यक्षम तंत्रज्ञान असे विविध विषय समर्थपणे सादर केले.







No comments:

Post a Comment