An apolitical and secular rural development organization, Jankidevi Bajaj Gram Vikas Sanstha (JBGVS) is a Registered Society that works under the patronage of Shri. Rahul Bajaj, Chairman of Bajaj Auto limited and under the guidance of Shri. Madhur Bajaj, Vice-Chairman of Bajaj Auto limited and Trustee of JBGVS. Bajaj Auto and Bajaj group undertakes its Corporate Social Responsibility works through JBGVS.
Saturday, December 31, 2016
Friday, December 30, 2016
Media coverage: JBGVS nutrition project - सकस आहार उपक्रम
Nutrition (especially for the underprivileged, including tribals) is an important endeavour of JBGVS under its healthcare focus area. The work done by JBGVS in promoting use of nutritious local food grains, tasty recipes derived from them and training sessions regarding the same was today covered in a detailed feature story in Indian Express (Pune edition).
Media coverage: SSK Aurangabad & rural plans - एसएसके औरंगाबाद व पुढील ग्रामीण वाटचाल
The recently organized anniversary of JBGVS' Samaj Seva Kendra in Aurangabad, during which the senior officer bearers also discussed the future rural development plans in the district, was today covered in Times of India (online edition).
जेबीजीव्हीएसच्या औरंगाबाद समाज सेवा केंद्राचा वर्धापन दिन नुकताच साजरा झाला, ज्यावेळी संस्थेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी त्या जिल्ह्यातील ग्राम विकास कार्याच्या पुढील वाटचालीची माहिती दिली - सदर बातमी टाइम्स ऑफ इंडिया (अॉनलाइन आवृत्ती) मध्ये आज प्रसिद्ध झाली
Wednesday, December 28, 2016
New school bus in Sikar - नवीन स्कूल बस
JBGVS is increasingly getting more and more active in Sikar district of Rajasthan. On 27th December a school bus was provided to Jamnalal Bajaj Higher Secondary School in the village Kashi ka Baas. This bus, funded by Bajaj CSR, was inaugurated at the hands of Mr Madhur Bajaj, Vice Chairman, Bajaj Auto & Trustee, JBGVS. Also present on the occasion was Mr C P Tripathi, Chairman, JBGVS. The event was covered in local newspapers.
जेबीजीव्हीएस राजस्थानच्या सिकर जिल्ह्यात अधिकाधिक सक्रीय होत आहे. दिनांक २७ डिसेंबर रोजी काशी का बास गावातील जमनालाल बजाज उच्च माध्यमिक शाळेला बजाज सामाजिक बांधिलकी अंतर्गत एक स्कूल बस प्रदान करण्यात आली. सदर बसचे अनावरण संस्थेचे विश्वस्त व बजाज ऑटोचे उपाध्यक्ष श्री मधुर बजाज यांच्या हस्ते करण्यात आले. या प्रसंगी संस्थेचे अध्यक्ष श्री सी पी त्रिपाठी उपस्थित होते. स्थानिक वृत्तपत्रांत याची बातमी प्रकाशित झाली.
जेबीजीव्हीएस राजस्थानच्या सिकर जिल्ह्यात अधिकाधिक सक्रीय होत आहे. दिनांक २७ डिसेंबर रोजी काशी का बास गावातील जमनालाल बजाज उच्च माध्यमिक शाळेला बजाज सामाजिक बांधिलकी अंतर्गत एक स्कूल बस प्रदान करण्यात आली. सदर बसचे अनावरण संस्थेचे विश्वस्त व बजाज ऑटोचे उपाध्यक्ष श्री मधुर बजाज यांच्या हस्ते करण्यात आले. या प्रसंगी संस्थेचे अध्यक्ष श्री सी पी त्रिपाठी उपस्थित होते. स्थानिक वृत्तपत्रांत याची बातमी प्रकाशित झाली.
Tabla & Harmonium Camp at SSK Pune - तबला व हार्मोनियमचे शिबीर
Through its Samaj Seva Kendras (SSKs), JBGVS not only works for the underprivileged in urban areas, but also helps promote a bridge between urban and surrounding rural areas. SSK in Akurdi near Pune is also engaged in cultural activities that promote the latent skills and qualities of youngsters in various performing and fine art categories. The recent Tabla and Harmonium camp, in which learners from Akurdi and surrounding areas participated, is a case in point. This was the third time that such a camp was organized. Here's a photographic depiction.
जेबीजीव्हीएसची समाज सेवा केंद्रे (एसएसके) फक्त शहरी निम्न आर्थिक गटातील लोकांसाठीच कार्यरत नसतात, तर शहरी व ग्रामीण लोकांतील तो एक दुवा सुद्धा आहे. पुण्याजवळच्या आकुर्डी येथील एसएसके मध्ये विविध सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करून लोकांतील सुप्त कला व कौशल्यांना व्यासपीठ पुरवले जाते. अलीकडेच तबला व हार्मोनियमचे शिबीर आयोजित करण्यात आले ज्यामध्ये आकुर्डी व आसपासचे साधक सहभागी झाले होते. अशा प्रकारचा हे तिसरे शिबीर होते. काही छायाचित्रे सोबत जोडली आहेत.
Monday, December 26, 2016
Media coverage: SSK Aurangabad anniversary/JBGVS future plans - एसएसके वर्धापन दिन/आगामी उपक्रम
The recent anniversary celebration of JBGVS' Samaj Seva Kendra (SSK) in Aurangabad and the future plans of JBGVS in the district were covered in the newspaper Divya Marathi (Aurangabad edition) and Time of India (Pune edition) - अलीकडेच संपन्न झालेला जेबीजीव्हीएस समाज सेवा केंद्राचा (एसएसके) वर्धापन दिन व संस्थेचे जिल्ह्यातील प्रस्तावित कार्य याची बातमी दिव्य मराठी (औरंगाबाद) व टाइम्स ऑफ इंडिया (पुणे) मध्ये प्रकाशित झाली
Thursday, December 22, 2016
New school building and media coverage: Wardha - वर्ध्यातील नवी शालेय इमारत व बातमी
Under its education program, JBGVS recently completed the construction of the new upper primary Jilha Parishad School in Takli (Chana) village in Wardha district of Maharashtra, in association with the local school management committee. The well-equipped building was inaugurated at the hands of Ms Naina Gunde, Chief Implementation Officer, Jilha Parishad and Mr Bharat Mahoday, Advisor to JBGVS (Wardha). The inauguration was done on the death anniversary of Sant Gadge Baba in remembrance of the great clean-up work undertaken by him. The event was covered in the Wardha edition of the newspaper Sakaal.
शिक्षण हा जेबीजीव्हीएसच्या पाच प्रमुख कार्यक्षेत्रांपैकी एक असून अलीकडेच संस्थे तर्फे वर्धा जिल्ह्याच्या टाकळी (चना) गावातील उच्च प्रार्थमिक जिल्हा परिषद शाळेच्या नव्या इमारतीचे बांधकाम पूर्ण करण्यात आले. स्थानिक शाळा व्यवस्थापन समितीच्या सहकार्याने हे काम पूर्णत्वास गेले. सुसज्ज अशा या शाळेचे उद्घाटन श्रीमती नैना गुंडे, मुख्य कार्यपालन अधिकारी, जिल्हा परिषद व श्री भरत महोदय, सल्लागार, जेबीजीव्हीएस (वर्धा) यांच्या हस्ते करण्यात आले. संत गाडगे बाबांच्या पुण्यतिथीला उद्घाटन करून त्यांच्या स्वच्छतेच्या महान कार्याला एक प्रकारे मानवंदना दिली गेली. या समारंभाची बातमी सकाळ (वर्धा आवृत्ती) मध्ये प्रकाशित झाली.
Tuesday, December 20, 2016
Media coverage: e-learning - इ-शिक्षण
In the education field, JBGVS has been focusing on e-learning as one of its thrust areas. It has been distributing e-learning units, which cover the entire state board school curriculum, to underprivileged schools. This interesting way of learning has not only reduced the school drop-out rate in many cases, but also is in line with the Digital India initiative of the government. Recently, the e-learning initiative of JBGVS was covered in the newspaper Sakaal (Nagpur).
आपल्या शैक्षणिक कार्यात जेबीजीव्हीएस इ-शिक्षणावर विशेष भर देते. राज्य पाठ्यपुस्तक मंडळाचे सर्व शालेय विषय इ-शिक्षण संचांच्या रुपात उपलब्ध असून निम्न आर्थिक स्थरातील शाळांना ते वितरीत करण्यात येतात. या आकर्षक शैक्षणिक पद्धतीमुळे विद्यार्थी गळतीचे प्रमाण तर घटलेच आहे, पण सरकारच्या डिजिटल इंडिया मोहिमेशी सुद्धा हे सुसंगत आहे. अलीकडेच सकाळ (नागपूर) मध्ये संस्थेच्या या उपक्रमाबद्दल लेख प्रकाशित झाला.
आपल्या शैक्षणिक कार्यात जेबीजीव्हीएस इ-शिक्षणावर विशेष भर देते. राज्य पाठ्यपुस्तक मंडळाचे सर्व शालेय विषय इ-शिक्षण संचांच्या रुपात उपलब्ध असून निम्न आर्थिक स्थरातील शाळांना ते वितरीत करण्यात येतात. या आकर्षक शैक्षणिक पद्धतीमुळे विद्यार्थी गळतीचे प्रमाण तर घटलेच आहे, पण सरकारच्या डिजिटल इंडिया मोहिमेशी सुद्धा हे सुसंगत आहे. अलीकडेच सकाळ (नागपूर) मध्ये संस्थेच्या या उपक्रमाबद्दल लेख प्रकाशित झाला.
Aurangabad SSK anniversary celebrations - औरंगाबाद एसएसके वर्धापन दिन समारंभ
Samaj Seva Kendra (SSK) of JBGVS in Aurangabad completed three years of operation and recently celebrated its anniversary at the sprawling green campus of Bajajvihar in the Pandhurpur suburb near the city. SSK Aurangabad is actively engaged in the areas of education, women empowerment, career guidance and healthcare. Here are some pictures of the anniversary celebrations.
जेबीजीव्हीएसचे औरंगाबाद येथील समाज सेवा केंद्र (एसएसके) गेली तीन वर्षे कार्यरत असून अलीकडेच शहराच्या पंढरपूर उपनगरातील बजाजविहार येथील विस्तीर्ण व गर्द हिरव्या आवारात केंद्राने वर्धापन दिन साजरा केला. एसएसके औरंगाबाद शिक्षण, महिला सबलीकरण, व्यवसाय मार्गदर्शन व आरोग्य अशा क्षेत्रांत कार्यरत आहे. वर्धापन दिन समारंभाची काही छायाचित्रे सोबत पहा.
जेबीजीव्हीएसचे औरंगाबाद येथील समाज सेवा केंद्र (एसएसके) गेली तीन वर्षे कार्यरत असून अलीकडेच शहराच्या पंढरपूर उपनगरातील बजाजविहार येथील विस्तीर्ण व गर्द हिरव्या आवारात केंद्राने वर्धापन दिन साजरा केला. एसएसके औरंगाबाद शिक्षण, महिला सबलीकरण, व्यवसाय मार्गदर्शन व आरोग्य अशा क्षेत्रांत कार्यरत आहे. वर्धापन दिन समारंभाची काही छायाचित्रे सोबत पहा.
Monday, December 19, 2016
Aurangabad work at a glance - औरंगाबाद येथील कार्याची झलक
JBGVS work in Aurangabad district of Maharashtra is progressing in leaps and bounds and spans diverse activities including deepening and widening of streams (nullahs) in line with the government's Jalyukt Shivar Yojana, school infrastructure, cow rearing and water purification plants. This is turning out as a blessing to the drought-prone district.
Thursday, December 15, 2016
School infrastructure: Provision of lockers - लॉकरची सुविधा
Education is one of the five focus areas of JBGVS rural development mandate. Improving school infrastructure is an integral part of the education endeavour. Recently, in an effort to reduce the school bag burden of the students, JBGVS provided lockers for the Jilha Parishad Primary School in Adhalwadi (Ghotwadi), Khed taluka, Pune district.
शिक्षण हा जेबीजीव्हीएसने एकात्मिक ग्राम विकास कार्यात प्राधान्य दिलेल्या पाच मुद्द्यांपैकी एक आहे. यामध्ये शाळांतील पायाभूत सुविधा सुधारणे हा सुद्धा एक महत्वाचा भाग आहे. अलीकडेच संस्थे तर्फे विद्यार्थ्यांच्या पाठीवरचे दप्तराचे ओझे कमी करण्याच्या हेतूने आढळवाडी (घोटवाडी), तालुका खेड, जिल्हा पुणे, येथील जिल्हा परिषद प्रार्थमिक शाळेत लॉकर सुविधा उपलब्ध करण्यात आली.
Wednesday, December 14, 2016
Media coverage: Cow rearing - कामधेनु गोपालन
JBGVS Kamdhenu Gopalan project that promotes cow rearing (including native breeds) has been active in the Maval region of Pune district. Recently the achievements were covered in a detailed feature story in the newspaper Sakaal (Maval supplement).
जेबीजीव्हीएस कामधेनु गोपालन प्रकल्प पुणे जिल्ह्याच्या मावळ भागात सक्रीय असून देशी गायींच्या पालनालाही प्रोत्साहन दिले जाते. त्यासंबंधी एक लेख अलीकडेच सकाळ (मावळ पुरवणी) मध्ये प्रकाशित झाला.
जेबीजीव्हीएस कामधेनु गोपालन प्रकल्प पुणे जिल्ह्याच्या मावळ भागात सक्रीय असून देशी गायींच्या पालनालाही प्रोत्साहन दिले जाते. त्यासंबंधी एक लेख अलीकडेच सकाळ (मावळ पुरवणी) मध्ये प्रकाशित झाला.
Goat rearing, a success story - शेळी पालन, एक यशोगाथा
While improving the economic situation in rural areas, if the age old eco-friendly lifestyle prevailing there is retained, only then can it be called as sustainable development. If done properly under supervision, goat rearing can be beneficial at the household as well as the village level, which has been proved by Shri Lakshman Mormare of Mormarewadi in Nane Maval area (Maval taluka, Pune district).
In March 2014, JBGVS has provided him with one male goat and four female goats, together constituting one group. In the past two years, he took good care of the same. The result is that now he has seven male goats and 25 female goats. This tribal family, which earlier used to barely manage to earn Rs 25-30,000 per annum, now earns Rs 1,00,000. From this family of four, one person is now full time engaged in this occupation.
ग्रामीण भागातील अर्थव्यवस्था सुधारताना तेथील पूर्वापार चालत आलेली पर्यावरणस्नेही जीवनपद्धती शाबूत ठेवली तरच त्याला शाश्वत विकास म्हणता येईल. योग्य देखरेखीखाली शेळी पालन केले तर घर व गाव अशा दोन्ही पातळ्यांवर फायदा होतो हे नाणे मावळ (तालुका मावळ, जिल्हा पुणे) भागातील मोरमारेवाडीच्या श्री लक्ष्मण मोरमारे यांनी सिद्ध करून दाखवलाय.
जेबीजीव्हीएस तर्फे त्यांना मार्च २०१४ मध्ये एक बोकड व चार शेळ्या मिळून एक गट देण्यात आला होता. गेल्या दोन वर्षांत त्यांनी निट देखरेख करून या गटाचा सांभाळ केला. परिणाम असा झाला की आता त्यांच्याकडे सात बोकड व २५ शेळ्या आहेत. जे वनवासी कुटुंब पूर्वी हलाकीच्या परिस्थितीत मोलमजुरी करून जेमतेम रु २५-३०,००० वार्षिक उत्पन्न कमवत होते, तेच आता रु १,००,००० पर्यंत कमवत आहेत. कुटुंबातील चार सदस्यांपैकी एक जण आता हा व्यवसाय पूर्णवेळ करत आहे.
Adolescent girls' training in Nane Maval - किशोरी प्रशिक्षण
The various activities that are regularly organized by JBGVS under its Adolescent Girls Development Program contribute to the Government of India’s Beti Bachao-Beti Padhao campaign. A training program was recently conducted in the villages of Taje and Pimploli in Nane Maval area of Maval taluka, Pune district, for adolescent girls in the age group of 14 to 18 years. The objective of the training was to focus on the physical and mental transition that takes place in adolescent girls.
The training was conducted through interesting interactive mediums like games, stories, quizzes and plays, in which 45 girls participated. The organizers observed that although guidance is provided in schools, many girls who have questions in their mind are very hesitant to ask. It was also observed that the above mentioned interactive mediums are very effective in driving home the point.
जेबीजीव्हीएसच्या किशोरी विकास उपक्रमांतर्गत वेळोवेळी जे कार्यक्रम आयोजित केले जातात त्यातून भारत सरकारच्या बेटी बचाव-बेटी पढाव मोहिमेला निश्चित हातभार लागत असतो. अलीकडेच पुणे जिल्ह्यातील मावळ तालुक्यात नाणे मावळ भागात ताजे व पिंपळोली गावांत १४ ते १८ वयोगटातील किशोरींसाठी प्रशिक्षण आयोजित करण्यात आले होते. किशोरवयीन मुलींमध्ये होणारे शारीरिक व मानसिक बदल यांबद्दल माहिती देणे हा मुख्य हेतू होता.
या प्रशिक्षणात खेळ, गोष्टी, प्रश्नमंजुषा व नाट्य यांसारख्या आकर्षक माध्यमांचा उपयोग करण्यात आला ज्यामध्ये ४५ किशोरी सहभागी झाल्या होत्या. आयोजकांचे असे निरीक्षण आहे की अनेक शाळांतून मार्गदर्शन केले जाते पण किशोरी मनात असलेले प्रश्न विचारायला संकोच करतात, तसेच वरील नाविन्यपूर्ण पद्धतीने विषय समजावून सांगायला सोपे जाते.
Subscribe to:
Posts (Atom)