Monday, January 30, 2017

Media coverage: Career guidance - व्यवसाय मार्गदर्शन

Under its education focus, JBGVS regularly reaches out to students with a variety of useful events and programs. Recently a career guidance workshop was organized in Wardha for rural students who have passed SSC and HSC exams. The same was covered in the newspaper Hitawada.
आपल्या शिक्षण विषयक कार्याच्या अनुषंगाने जेबीजीव्हीएस नेहेमी विविध उपक्रमांच्या माध्यमांतून विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचत असते. अलीकडेच वर्ध्यात दहावी व बारावी उत्तीर्ण झालेल्या मुलांसाठी एक व्यवसाय मार्गदर्शन शिबीर आयोजित करण्यात आले होते. सदर बातमी हितवाद मध्ये प्रसिद्ध झाली.


Friday, January 27, 2017

Mahila Melawa - महिला मेळावा

JBGVS works on its agenda of women empowerment, especially in rural areas, in a variety of ways. Along with interventions at the grass root level, it is also important to review and felicitate the co-partners (beneficiaries) periodically. The annual Mahila Melawa of the Andra Maval region of Pune district and a cultural event on eve of Makar Sankrant was jointly organized by JBGVS and self-help groups (SHGs). The 500 participating women from 30 SHGs from across 18 villages were provided guidance by way of talks and street plays on topics like women empowerment, Swachh Bharat Abhiyan, importance of Sankrant festival, tree plantation, safeguarding of girl child and position of women in society. Several interesting games were also organized for the women.
महिला सबलीकरणाच्या मुद्द्यावर जेबीजीव्हीएस नेहेमीच विविध प्रकारे कार्यरत असते, विशेषतः ग्रामीण भागांत. प्रत्यक्ष कृतीसोबतच वेळोवेळी झालेल्या कामाचा आढावा व लाभार्थींचे अभिनंदन करणेही गरजेचे असते. अलीकडेच पुणे जिल्ह्यातील आंद्र मावळ भागात वार्षिक महिला मेळावा व संक्रांत उत्सव बचत गट व संस्थेच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आला होता. एकूण १८ गावांतील ३० बचत गटांच्या ५०० महिलांनी यामध्ये सहभाग घेतला. भाषणे व पथनाट्ये या माध्यमांतून त्यांना महिला सबलीकरण, स्वच्छ भारत अभियान, संक्रांतीचे महत्व, वृक्ष लागवड, बेटी बचाव-बेटी पढाव आणि समाजातील महिलांचे स्थान या विषयांवर मार्गदर्शन करण्यात आले. विविध खेळांचेही आयोजन करण्यात आले होते.
Wednesday, January 25, 2017

Agricultural exhibition visit - शेती प्रदर्शनाला भेट

JBGVS always tries to provide exposure to its co-partners (beneficiaries) about the new techniques in agriculture and other rural occupations. Recently 11 farmers from Bhoire and Kondiwade villages of Maval taluka in Pune district, were taken on a study tour to the agricultural exhibition organized by Krushi Vidnyan Kendra run by Agricultural Development Trust in Baramati. The exhibition provided demonstrations, interaction with experts, information on new techniques and equipment, animal husbandry, etc.
जेबीजीव्हीएस नेहेमीच लाभार्थींना शेती व अन्य ग्रामीण व्यवसायांतील नवीन पद्धतींची माहिती मिळावी अशा प्रयत्नात असते. अलीकडेच अॅग्रीकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्टच्या कृषी विज्ञान केंद्राने आयोजित केलेल्या बारामती मधील कृषी प्रदर्शनाला जेबीजीव्हीएसने पुण्याच्या मावळ तालुक्यातील भोयरे आणि कोंडीवडे गावांतील ११ शेतकऱ्यांना अभ्यास दौऱ्यावर नेले होते.


New school in Uttarakhand - उत्तराखंडात नवी शाळा

In its endeavour to promote education among the economically backward sections, JBGVS not only tries to improve the quality of education, but also creates the school infrastructure. Recently, a new school building was built and inaugurated in Khurpiya Bhooda Gauri village of Udham Singh Nagar district in Uttarakhand. The old school building was dilapidated and hazardous and hence a new building was constructed. This school primarily caters to children of labourers.
आपल्या शिक्षण प्रसाराच्या कार्यात जेबीजीव्हीएस फक्त शैक्षणिक दर्जाच सुधारत नाही तर पायाभूत सुविधा सुद्धा निर्माण करते. अलीकडेच उत्तराखंडातील उधम सिंह नगर जिल्ह्यात खुर्पिया भूडा गौरी गावात संस्थेने नवीन शाळेची इमारत बांधून दिली. जुनी इमारत धोकादायक झाली होती. सदर शाळेत मुख्यत्वे कामगारांची मुले येतात.
Tuesday, January 24, 2017

Media coverage: Wardha animal husbandry - वर्धा पशुपालन

JBGVS work in the field of animal husbandry has been significant. Wardha has been a case in point with cows (including the native Gaolao breed), buffaloes and goats distributed among poor farmers. JBGVS has also supported the Central Breeding Institute and the new Fodder Cafeteria in the district by providing facilities to ensure water supply. The news on this development was recently published on the online news portal Forever News.
जेबीजीव्हीएसचे पशुपालन क्षेत्रातील कार्य लक्षणीय असून वर्धा जिल्ह्यात गायी (स्थानिक गवळाऊ जाती सहित), म्हशी व शेळ्या मोठ्या प्रमाणावर गरीब शेतकऱ्यांना वाटण्यात आल्या आहेत. तसेच केंद्रीय प्रजनन संस्था व नवीन चारा निर्मिती केंद्राला पाणी पुरवठा सुरळीत व्हावा म्हणून व्यवस्था केली. या बाबतची बातमी नुकतीच फॉरएव्हर न्यूज या संकेतस्थळावर प्रसिद्ध झाली.


Media coverage: Water conservation - जल संधारण

Mr Madhur Bajaj, Vice Chairman, Bajaj Auto and Trustee, JBGVS, while recently speaking at a conference in Mumbai, highlighted the ongoing water conservation efforts of Bajaj Group and JBGVS in the drought prone rural areas of Maharashtra. The same was covered in Navbharat Times.
अलीकडेच मुंबईत एका परिषदेत बोलताना श्री मधुर बजाज, उपाध्यक्ष, बजाज ऑटो व विश्वस्थ, जेबीजीव्हीएस, यांनी संस्थेच्या महाराष्ट्राच्या दुष्काळी ग्रामीण भागांत चालू असलेल्या पाणी संवर्धनाच्या कार्याची माहिती दिली. सदर बातमी नवभारत टाइम्स मध्ये प्रसिद्ध झाली.

Thursday, January 19, 2017

Inputs in agriculture - शेतीमध्ये योगदान

As a part of its economic development agenda, JBGVS intervenes in agriculture in a variety of ways including assistance in horticulture (mango and avla orchards), soil testing, use of proper equipment, drip irrigation and vermi-composting. आपल्या आर्थिक विकासाच्या मुद्द्याला अनुसरून जेबीजीव्हीएस अनेक प्रकारे शेती मध्ये सुधारणा व्हावी म्हणून मदत करत असते. यामध्ये बागायती (आंबा व आवळा), मातीची चाचणी, योग्य अवजारांचा वापर, ठिबक सिंचन व सेंद्रिय खत यांचा समावेश आहे.

Tuesday, January 17, 2017

Mobile clinic - फिरता दवाखाना

Many times remote rural areas do not have access to even basic medical support and information. The mobile clinic (ambulance) of JBGVS is hence a welcome visitor is the villages of Khed and Maval talukas of Pune district, where it travels through out the week, along with doctors and health workers.
दुर्गम ग्रामीण भागांत अनेक वेळा मुलभूत वैद्यकीय मदत व माहितीचा सुद्धा अभाव असतो. त्यामुळे मावळ व खेड तालुक्यांतील गावांत जेबीजीव्हीएसच्या फिरत्या दवाखान्याची (अॅब्यूलंस) ग्रामस्थ आतुरतेने वाट पाहात असतात. संपूर्ण आठवडा हा फिरता दवाखाना डॉक्टर व आरोग्य सेवकांसोबत या भागात भ्रमण करतो.

Tuesday, January 10, 2017

Fodder Cafeteria - चारा निर्मिती केंद्र

The veterinary clinic in Pulgaon village with support from Panchayat Samiti of Deoli in Wardha district of Maharashtra, has started a unique Fodder Cafeteria to demonstrate growing of grass and provide grass seeds and samples to farmers owning livestock. JBGVS has provided drip irrigation system to this centre.
वर्धा जिल्ह्यातील देवळी पंचायत समितीच्या सहकार्याने पुलगाव येथील पशुवैद्यकीय दवाखान्यातर्फे चारा निर्मिती केंद्र सुरु करण्यात आले आहे. चारा उगवण्याच्या पद्धतीचे प्रात्यक्षिक दाखवण्यासोबत गवताचे नमुने व बियाणे येथे पशुधन असलेल्या शेतकऱ्यांना देण्यात येईल. जेबीजीव्हीएसने या केंद्राला ठिबक सिंचन व्यवस्था बसवून दिली आहे.


Monday, January 9, 2017

Media coverage: Water conservation work - जलसंधारण कार्य

Mr Madhur Bajaj, Vice Chairman, Bajaj Auto and Trustee, JBGVS, while recently speaking at a conference in Mumbai, highlighted the ongoing water conservation efforts of Bajaj Group and JBGVS in the drought prone rural areas of Maharashtra. The same was covered in a news in Business Standard.

अलीकडेच मुंबईत एका परिषदेत बोलताना श्री मधुर बजाज, उपाध्यक्ष, बजाज ऑटो व विश्वस्थ, जेबीजीव्हीएस, यांनी संस्थेच्या महाराष्ट्राच्या दुष्काळी ग्रामीण भागांत चालू असलेल्या पाणी संवर्धनाच्या कार्याची माहिती दिली. सदर बातमी बिझनेस स्टँडर्ड मध्ये प्रसिद्ध झाली.


Saturday, January 7, 2017

Media coverage: SSK Pune Sports Day - एसएसके पुणे स्पोर्ट्स डे

JBGVS' Samaj Seva Kendra had recently organized an innovative Sports Day, which was open for children as well as adults residing in the surrounding areas in Pimpri-Chinchwad. The same was covered in the newspaper Lokmat.

जेबीजीव्हीएसच्या समाज सेवा केंद्राने अलीकडेच आसपासच्या परिसरातील मुले व मोठी माणसे अशा दोघांसाठी एक आगळा-वेगळा स्पोर्ट्स डे आयोजित केला होता. त्याची बातमी लोकमत मध्ये प्रकाशित झाली

Wednesday, January 4, 2017

Bajaj Education Initiative: Pre-primary teachers' training - पूर्व-प्रार्थमिक शिक्षक प्रशिक्षण

Under its education focus area, JBGVS reaches out to children from all age groups. Among them, pre-primary children are an important segment, since that is the time when they are developing their grasping power and basic understanding about the world around them. As a part of the same, a training program was recently organized in JBGVS headquarters in Akurdi, near Pune, for pre-primary teachers under the Bajaj Education Initiative (BEI). A total of 54 teachers availed of this informative workshop, wherein various interesting sessions were conducted covering topics like story telling, creative ideas on low cost learning material and introduction of basic scientific and maths concepts. Over 98% participants found the workshop interesting and useful. The resources persons were Dr Aparna Kulkarni, Ms Ashwini Godse and Ms Amruta Tikhe.
आपल्या शैक्षणिक कार्यक्षेत्रांतर्गत जेबीजीव्हीएस सर्व वयोगटांतील मुलांसाठी कार्यक्रम राबवत असते. पूर्व-प्रार्थमिक गटातील मुलांपर्यंत पोहोचणे सुद्धा आवश्यक असते कारण याच काळात त्यांची आकलन शक्ती व आसपासच्या परिसराचे जुजबी ज्ञान विकसित होत असते. अलीकडेच बजाज शिक्षण उपक्रमांतर्गत जेबीजीव्हीएसच्या आकुर्डी येथील मुख्यालयात पूर्व-प्रार्थमिक शिक्षकांसाठी एक प्रशिक्षण आयोजित करण्यात आले होते. गोष्टी सांगणे, अल्प दरात व कलात्मक पद्धतीने शैक्षणिक साहित्य निर्माण करणे आणि विज्ञान व गणिताचे मुलभूत मुद्दे अशा विविध विषयांवर सत्रे असलेल्या या कार्यक्रमात ५४ शिक्षकांनी भाग घेतला. यातील ९८% हून अधिक शिक्षकांना हे प्रशिक्षण उपयोगी व आकर्षक वाटले. डॉ अपर्णा कुलकर्णी, श्रीमती अश्विनी गोडसे व श्रीमती अमृता तिखे यांनी सहभागींना प्रशिक्षण दिले.Monday, January 2, 2017

Success story: Income from cow rearing - गोपालनातील उत्पन्न

In its endeavour of integrated rural development JBGVS has witnessed many success stories till now. One instance is that of Mr Dnyaneshwar Kakade - a farmer of Shindewadi village from Maval taluka of Pune district. JBGVS, in association with Rotary Club of Poona North, had provided him with one cow and funds for construction of cowshed in 2012. Today, he has a total of eight cows (including the offspring of the first cow and two new cows purchased from funds generated by sale of milk of the earlier cows). Over these years he has earned a net income of Rs 3,80,000 from sale of milk and Rs 36,000 from sale of organic fertilizer (gobar).
आपल्या एकात्मिक ग्राम विकासाच्या ध्येयात जेबीजीव्हीएसने अनेक यशोगाथा अनुभवल्या आहेत. पुण्याच्या मावळ तालुक्यातील शिंदेवाडी गावातील श्री ज्ञानेश्वर काकडे यांची कथा यापैकीच आहे. जेबीजीव्हीएस व रोटरी क्लब ऑफ पूणा नॉर्थ यांच्या संयुक्त विद्यमाने २०१२ मध्ये त्यांना एक नवीन गाय व गोठा बांधण्यासाठी अर्थ सहाय्य देण्यात आले. आज त्यांच्या कडे आठ गायी आहेत (मूळ गायीची मोठी झालेली वासरे व या आधीच्या गायींच्या दुध विक्रीच्या पैशातून विकत घेतल्या नवीन गायी अशा दोन्हींचा यात समावेश आहे.) मागील चार वर्षांमध्ये श्री काकडे यांनी गायीच्या दुघ विक्रीतून रु ३,८०,००० नफा व सेंद्रिय खत (शेण) विक्रीतून रु ३६,००० नफा मिळवला आहे.